ठाणे आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या एकूण ४०० जागा

Mahatribal-Thane Recruitment 2018 : Various 400 Posts

1,695

★ठाणे आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या एकूण ४०० जागा★

ठाणे आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवरील शिक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी केवळ ठाणे, पालघर आणि पुणे जिल्ह्यामधील केवळ अनुसूचित जमाती (एस.टी) प्रवर्गातील पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

★प्राथमिक शिक्षक (मराठी/ इंग्रजी) पदाच्या १९३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ४५% गुणांसह बारावी उत्तीर्णसह डी.एड./ डी.टी.एड. (मराठी/ इंग्रजी माध्यम) आणि टीईटी/ सीईटी उत्तीर्ण असावा.

★माध्यमिक शिक्षक (मराठी/इंग्रजी) पदाच्या ६३ जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि बी.ए.(इंग्रजी) आणि बी.एड. किंवा बी.एस्सी.बी.एड अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे.

★उच्च माध्यमिक शिक्षक पदाच्या एकूण ६१ जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि बी.एड. किंवा एम.एस्सी.बी.एड. अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे.

★गृहपाल (स्री/पुरुष) पदाच्या ६४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने समाजकार्य/ समाज कल्याण प्रशासन/ आदिवासी कल्याण/ आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी.

★ग्रंथपाल पदाच्या एकूण १५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह लायब्ररी सायन्स डिप्लोमा/ ग्रंथालय शास्त्र पदवीधारक असावा.

★प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या १४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

★वय – उमेदवाराचे वय ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४३ वर्ष दरम्यान असावे. (अपंग/ माजी सैनिक/ प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी २ वर्ष सवलत आणि खेळाडू/ शासकीय आश्रमशाळेत किमान पाच वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

★नोकरीचे ठिकाण – ठाणे, पालघर आणि पुणे जिल्हा

★परीक्षा फी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ८००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना ७००/- रुपये आहे

★अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ आणि ८ जानेवारी २०१९ आहे.

 

 

★शिक्षक भरती जाहिरात डाउनलोड करा★

 

★गृहपाल भरती जाहिरात डाउनलोड करा★

★अधीक्षक भरती जाहिरात डाउनलोड करा★

★ग्रंथपाल भरती जाहिरात डाउनलोड करा★

★ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा★

 

Leave A Reply

Your email address will not be published.