मोठी बातमी! महाराष्ट्र पोलीस भरती 2025 ची तारीख जाहीर – 10,000 पदांसाठी अर्ज 15 सप्टेंबरपासून सुरू!
Maharashtra Police Bharti 2025 Recruitment process will begin from 15th September 2025!! This is really a big update for all cadidates preparing for Police Bharti 2025. The registration process will begin soon for this recruitment process. More details are given below.
सध्या उन्हाळा सुरु आहे. उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच पोलिस भरतीची मैदानी चाचणी सुरु होणार आहे. साधारणपणे १५ सप्टेंबरनंतरच पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु होईल, असं सांगण्यात येत आहे. पोलिस भरतीमध्ये एका पदासाठी एकाच ठिकाणी अर्ज करायचे आहे. जर तुम्ही जास्त अर्ज भरले तर ते बाद करण्यात येईल. दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल उमेदवाराला बाद ठरवण्यात येईल. जर एखादा उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यात उपस्थित राहिला तर त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल चाचणी देता येणार नाही. या भरतीसाठी ४ महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यंदा पोलिस भरतीमध्ये (Police Bharti 2025) एकूण १० हजार पदे भरली जाणार आहे. राज्यात गणेशोत्सव झाल्यानंतर लगेचच पोलिस भरती होणार आहे. ६ सप्टेंबरला गणपती विसर्जन होतील.त्यानंतर भरती प्रक्रिया राबवण्याचे नियोजन गृह विभागाने केलं आहे. यंदा १० हजार पोलिस भरतीसाठी १२ ते १३ लाख अर्ज येऊ शकतात. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने सध्या पोलिस भरती घेतली जाऊ शकणार नाही. पावसामुळे मैदानी चाचणी घेता येणार नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्येच ही भरती घेण्यात येणार आहे
राज्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून ६ सप्टेंबरला विसर्जन मिरवणुका निघतील. त्यानंतर पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. मागील भरतीवेळी पावसाळ्यात उमेदवारांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आता आगामी भरती पावसाळ्यानंतर गणेशोत्सव संपल्यावर होणार आहे. आगामी दहा हजार पोलिस भरतीसाठी राज्यभरातून अंदाजे १२ ते १३ लाख अर्ज अपेक्षित आहेत. सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावसामुळे मैदानी चाचणी घेता येत नसल्याने गणेश विसर्जनानंतर भरती सुरू केली जाणार आहे. सुरवातीला मैदानी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल.
दरम्यान, एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या पोलिस भरतीवेळी १७ हजार ४७१ जागांसाठी १७ लाखांवर अर्ज आले होते. आताही अर्जांची संख्या त्या प्रमाणातच राहील, यादृष्टीने पोलिस भरतीचे नियोजन केले जात आहे. पोलिस भरतीची मैदानी एकाचवेळी संपूर्ण राज्यभरात सुरू होईल. मैदानीतून १:१० प्रमाणात (एका पदासाठी दहा उमेदवार) उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांच्या पुढाकारातून मागील तीन वर्षांत ही दुसरी मोठी पोलिस भरती होत आहे.
एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन
राज्यातील प्रत्येक उमेदवारास पोलिस भरतीतील एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे. त्याशिवाय जास्त भरलेले उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जाणार आहेत. याव्यतिरिक्त, एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला नजरचुकीने हजर राहिला असेल आणि तो त्याठिकाणी मैदानी चाचणीत पात्र जरी ठरला, तरी त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरविण्यात येईल, असा भरतीचा महत्त्वाचा निकष असणार आहे.