Wednesday, November 05, 2025

MHADA Lottery: म्हाडाच्या ५०२ घरासांठी अर्ज करण्यास मुदतवाढ

म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २० टक्के सर्वसमावेशक घटकांतर्गत ५०२ घरांच्या लॉटरीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी २० मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


megabharti-mhada-lottery-mahadacaya-gharasatha-araja-karanaeyasa-mathatavadha

MHADA Konkan Board Thane Flats: म्हाडाच्या विविध मंडळांच्या मार्फत ठिकठिकाणी अल्पदरात घरे विक्री करण्यासाठी सोडत काढण्यात येत असते. ही संपूर्म प्रक्रिया ऑनलाईन माध्यमातून होत असते. गेल्या काही वर्षांत म्हाडाकडून मुंबई, ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात सदनिका उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र, कोकण मंडळाकडून काढण्यात आलेल्या ठाणे जिल्ह्यातील काही घरांकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचं लक्षात आलं. त्यामुळे आता ही घरे विक्री करण्यासाठी म्हाडाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

ठाणे जिल्ह्यातील शिरढोण आणि खोणी या भागात म्हाडाने मोठ्या प्रमाणात घरांची उभारणी केली आहे. तसेच इतरही काही घरांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र, या घरांसाठी काढण्यात आलेल्या लॉटरीला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचं पहायला मिळालं. या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांनी या घरांकडे पाठ फिरवली असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर आता म्हाडाने या घरांच्या विक्रीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा : पसंतीचा फ्लॅट न मिळाल्याने घरे परत करण्यासाठी झुंबड, गुढीपाडव्याला 6500 घरांची पुन्हा लॉटरी निघणार?

शिरढोण आणि खोणी येथे म्हाडाची किती घरे?

शिरढोण परिसरात 7669 घऱे बांधलेली आहेत तर 11023 घरांना मंजुरी मिळाली आहे. तर खोणी परिसरात 5060 घरे बांधलेली आहेत. शिरढोण येथील एकूण घरांपैकी 7141 घरे ही अत्यल्प उत्पन्न गटातील आहेत तर 528 घरे अल्प उत्पन्न गटातील आहेत.